सलग १५ व्या दिवशीही पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुचं     

मुंबई : पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून देशभरात सरकारवर टीकेची झोड उठत असताना अद्यापही, इंधनाचे दर नियंत्रणात आणण्यात सरकारला यश मिळालेलं नहिये. आज सलग १५ दिवशीही  पेट्रोलच्या किंमतीमध्ये वाढ होऊन पेट्रोल 12 पैशांनी महागले.

मुंबईत पेट्रोलचे दर 86 रुपये 8 पैशांवर, तर डिझेलचे दर 73 रुपये 64 पैशांवर पोहचले आहेत. सलग होत असलेल्या या  इंधन दरवाढीचा परिणाम वाहतुकीवर होतं असल्याने सर्व जीवनावश्यक वस्तू देखील महाग झाल्या आहेत. इंधन दर वाढीवरून विरोधक सातत्याने सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी यांनी केंद्र  सरकारवर  टीका करत मोदींना पेट्रो -डिझेलच्या किंमती कमी करण्याचं चॅलेंज देखील दिलं होतं. मात्र मोदींकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली  नाहीये.

दरम्यान कर्नाटक निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. कर्नाटक निवडणुकीच्या काही दिवस आधी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. त्यानंतर मागील दोन आठवड्यातत इंधनाच्या दरात सतत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.