सर्वसामान्यांना दिलासा: सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल – डिझेलच्या दरात कपात

मुंबई : वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले आहेत.१६ दिवसानंतर काल पेट्रोल आणि डिझेलचे दर अवघ्या १ पैशाने कमी करण्यात आले होते.

दरम्यान पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी किरकोळ कपात करण्यात आली आहे. पेट्रोल प्रति लिटर ७ पैसे तर डिझेल ५ पैशांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर ७८.३५ रूपये आणि डिझेल ६९.२५ रूपये असा आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर ८६.१६ रूपये तर डिझेल ७३.७३ रूपये असा दर आहे.

दरम्यान मंगळवारी लखनऊ येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी डॉलर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे स्पष्ट केले होते. तसेच इंधन दरवाढीवर नियंत्रण ठेवण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचं देखील ते म्हणाले होते.

You might also like
Comments
Loading...