मराठा आरक्षणात आणखी एक अडथळा, कोर्टात नवीन याचिका

मुंबई – महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणाच्या कायद्याला विरोध करणारी नवीन याचिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. ऍड. संजित शुक्‍ला यांनी आरक्षणाविरोधात हि दुसरी याचिका दाखल केली आहे. यापूर्वी ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात याचिका केली आहे.

मराठा समाज सधन समाज आहे. त्यांना आरक्षणाची आवश्‍यकता नाही, असा दावा याचिकाकर्ते ऍड. संजित शुक्‍ला यांनी केला आहे. मुख्य न्या. नरेश पाटील यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी ही याचिका सादर करण्याची शक्‍यता आहे.

मराठा समाजाची मते मिळवण्यासाठीच मराठा आरक्षणाचा निर्णय – प्रकाश आंबेडकर