मुंबई : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या प्रमुख मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. (MSRTC Strike) तसेच काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab) यांनी पगार वाढीचा निर्णय जाहीर केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर रहाण्याचे आवाहन केले आहे. परंतु त्यानंतरही अनेक कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी अडून बसले असून कामावर येण्यास तयार नाहीत. त्यामुळे अनेकांवर निलंबनाची कारवाई सुरु करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता एसटी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचे वेतन हे नवीन वेतनवाढीनुसार देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. यासांदर्भात महामंडळाने परिपत्रक जारी केले असून नवनियुक्त ते दहा वर्ष कालावधी झालेल्या कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये वाढ मिळणार आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन हे दर महिन्याच्या सात तारखेला होते. जे कर्मचारी कर्तव्यावर आहेत, त्यांनाच नवीन वेतनवाढ मिळेल.
महामंडळाने काढलेल्या परिपत्रकात सुधारित वेतनवाढीनुसार नव्याने नियुक्ती मिळालेल्या आणि १० वर्षांच्या कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपयांची वाढ केली आहे. १० ते २० वर्षांपर्यंतची सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना ४,००० रुपयांची पगारवाढ, तसेच २० वर्षांपेक्षा अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना २ हजार ५०० रुपये पगारवाढ दिल्याचे नमूद केले आहे. फक्त एवढेच नाही तर कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ताही देण्यात येणार आहे.
दरम्यान, महामंडळाने कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरूच ठेवली असून बुधवारी(१ डिसें.) ४४८ कर्मचारी निलंबित करण्यात आले. त्यामुळे एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या ८ हजार ६४३ झाली आहे. तसेच रोजंदारीवरील ६५ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त झाली. आत्तापर्यंत १ हजार ८९२ कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शेतकरी काही फुकटा नाही, वीजबिलांवरचा दंड माफ करा’
- ‘कॉंग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय’
- औरंगाबादेत चक्क स्मशानभूमीतच केली बेकायदेशीर प्लॉटिंग!
- मी अनिल देशमुखांना कधी भेटलो ते मला आठवत नाही; सचिन वाझेची साक्ष
- ‘आदित्य ठाकरे माणुसकी जपा, आपल्या कर्माचा हिशोब इथेच चुकवावा लागतो’
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<