सर्व विरोधीपक्ष एकत्र आल्यास भाजपचा पराभव अटळ – शरद पवार

शरद पवार

मुंबई : सध्या देशात सरकारचे एकखांबी नेतृत्व चालत असून, या विरोधात सर्व विरोधक एकवटत आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यानंतर 1977 मध्ये सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते. त्यावेळी विरोधकांनी इंदिरा गांधीचे सरकार कोसळवले होते. सध्या 1977 सारखीच परिस्थिती झाली असून, विरोधक एकत्र आल्याने सरकारचा पराभव निश्चित आहे. असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकांत दहा पैकी 9 जागी भाजपा पराभूत झाली. त्यामुळे बदलत चाललेले जनमत लक्षात घेऊन आता समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची भूमिका घेतली पाहिजे, आणि ही विरोधकांसाठी मोठी गोष्ट आहे. जर सर्व विरोधक एकत्र आल्यास भाजपचा पराभव अटळ आहे.