मुंबईसह उपनगरांमधील धोका वाढला, डोंबिवलीत एकाच दिवशी 6 जण कोरोनाबाधित

कल्याण : मुंबईसह उपनगरांनाही कोरोनाने विळखा घातला असल्याचं समोर आलंं आहे. कारण आता कल्याण डोंबिवली महापलिका परिसरातही एकाच दिवशी 6 रुग्ण आढळल्याची माहिती समोर  आली आहे. त्यामुळे आता कोरोनाचे संकट अधिक वाढत असल्याचं स्पष्ट झाले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत  गेल्या 24 तासांमध्ये नवे रुग्ण वाढल्यामुळे खळबळ उडाली आहे. डोंबिवली परिसरात 5 रुग्ण तर कल्याणमध्ये 1 रुग्ण आढळला आहे. डोंबिवलीतील 5 रुग्ण हे तुकारामनगर परिसरातील असल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे.

खबरदारी म्हणून या सहा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या घरातील सदस्य, परिसरातील नागरिक आणि इतर लोकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांचीही तपासणी केली जाणार आहे.  कल्याण डोंबिवली परिसरात 9 एप्रिलपर्यंत कोरोनाबाधितांची संख्याही 43 वर पोहोचली होती. आज यामध्ये या नव्या 6 रुग्णांचा भर पडली आहे.

दरम्यान राज्यातील कोरोनाबाधीतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. असे असतानाचं मुंबईची धाकधूक वाढवणारे वृत्त समोर आले आहे.  धारावीमध्ये आणखी  5 नवे रुग्ण आढळून आले आहेत.   आता या नवीन  रूग्णांंनंतर धारावीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 25 गेली आहे.