उत्तर प्रदेशात यादवी; शिवपाल यादवांचा नवीन पक्ष

Shivpal-Yadav

टीम महाराष्ट्र देशा– समाजवादी पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. समाजवादीतील नाराज नेते शिवपाल सिंह यादव यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आता स्वतःचा समाजवादी सेक्युलर मोर्चा नावाने नवीन पक्ष तयार केला आहे. या पक्षाच्या माध्यमातून समाजवादीमधील उपेक्षित लोकांना जोडले जाईल. तसेच अन्य छोट्या पक्षांना बरोबर घेणार असल्याची घोषणा शिवपाल यादव यांनी आज केली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात भाजपाचा सहयोगी पक्ष असलेल्या भारतीय सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (एसबीएसपी) चे अध्यक्ष आणि योगी सरकारमध्ये मंत्री असलेले ओम प्रकाश राजभर यांनी मंगळवारी शिवपाल यादव यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यामुळे शिवपाल यादव हे सुद्धा या पक्षात सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता नव्या पक्षाची घोषणा केल्यानंतर शिवपाल यादव मुलायम सिंह यांची भेट घेण्यासाठी जाण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव हे सुद्धा या पक्षात दाखल होतील, दावा शिवपाल यादव यांनी केला आहे