टेनिसपटू सानिया आणि शोएब यांची नवी ‘पार्टनरशीप’; दोघांनी टीझर शेअर करताच वाढली उत्सुकता

टेनिसपटू सानिया आणि शोएब यांची नवी ‘पार्टनरशीप’; दोघांनी टीझर शेअर करताच वाढली उत्सुकता

sania mirza,shoaib malik

मुंबई : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Tennis player Sania Mirza) आणि तिचा नवरा म्हणजेच पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक (Pakistani cricketer Shoaib Malik ) नेहमीच वेगवगेळ्या कारणांसाठी चर्चेत असतात. नुकतेच या दोघांनी एक व्हिडीओ शेअर करत जवळपास सारखीच कॅप्शन दिलीय आणि हा आपला संयुक्त प्रोजेक्ट असल्याचं म्हटलं आहे. या दोघांच्या कॅप्शनमध्ये ‘लव इज इन दी एअर ‘ असा कॉमन हॅशटॅग दोघांनी वापरल्याने या मालिकेचं किंवा चित्रपटाचं हेच नाव असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान सानिया आणि शोएब दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांसाठी एक सारखाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एखाद्या मालिकेचा किंवा चित्रपटाच्या टीझरची झलक दाखवणारा आहे. तसेच सारखीच कॅप्शन दिलीय आणि हा आपला संयुक्त प्रोजेक्ट असल्याचं म्हटलं आहे. या दोघांच्या कॅप्शनमध्ये  ‘लव इज इन दी एअर’ असा कॉमन हॅशटॅग दोघांनी वापरल्याने या मालिकेचं किंवा चित्रपटाचं हेच नाव असेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. या टीझरमध्ये सानिया मिर्झाचा चेहरा दिसत नाहीय मात्र शोएब मलिक दोन सीनमध्ये दिसतोय. एका ठिकाणी तो धावाताना दिसत आहे तर एका सीनमध्ये तो कारमधून बाहेर येताना दिसतोय. सानियाचा चेहरा दिसत नसला तरी एक महिला पांढऱ्या कपड्यांमध्ये टेनिस कोर्टवर दिसत आहे. ही महिला म्हणजे सानिया असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

“ज्या प्रोजेक्टवर मी काम करत आहे त्याचा टीझर शेअर करताना फार आनंद वाटतोय. याचं संपूर्ण व्हर्जन लवकरच येत आहे,” असं सानियाने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. तर शोएब मलिकने, “मला माझ्या या प्रजोक्टचा टीझर शेअर करताना फार अभिमान वाटतोय. लवकरच तुम्हाला पूर्ण व्हर्जन पहायला मिळेल,” असं म्हटलंय. मात्र हे दोघे ज्याला प्रोजेक्ट म्हणत आहेत ती मालिका आहे की चित्रपट हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. कमेंटमध्ये अनेकांनी वेगवेगळे तर्क लावले आहेत. काहींनी ही मालिका असल्याचं म्हटलंय तर काहींनी या दोघांच्या प्रेमकथेवर आधारित चित्रपट असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दोघांनी २०१० रोजी हैदराबादमध्ये पारंपारिक पद्धतीने लग्न केले असून त्यांना एक मुलगा आहे.

टेनिसपटू सानिया मिर्झाचे पहा आणखी काही फोटो.

 

 

महत्वाच्या बातम्या: