धक्कादायक : बिग बॉस मधील ‘या’ सेलिब्रेटीला झाली कोरोनाची लागण

bigg boss

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. तसेच देशातील कोरोना बाधितांनी सहा लाखाचा टप्पा गाठला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील पोलीस प्रशासन, वैद्यकीय प्रशासनाला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती. कोरोनाच्या विळख्यात अनेक सेलिब्रेटी देखील अडकले आहेत यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे.

बिग बॉस फेम अनिल थत्ते यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आपली अनोखी पोषाख पद्धती आणि गगनभेदी या साप्ताहिकामुळे राज्यभर आपला चाहतावर्ग निर्माण करण्यात अनिल थत्ते यशस्वी ठरले आहेत. मराठी बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या दुसऱ्या पर्वात त्यांचा सहभागचांगलाच गाजला होता. त्यामुळे त्यांना बिग बॉस फेम म्हणूनही ओळखले जाऊ लागले. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती अनिल थत्ते यांनी स्वत:च फेसबुक व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे.

थत्ते म्हणाले, “सध्या मी रुग्णालयात असून मला करोनाची लागण झाली आहे,” असं अनिल थत्ते म्हणाले. गेले अनेक दिवस करोनाची लागण होऊ नये यासाठी मी वर्क फ्रॉम होम करत होतो. परंतु आज तो व्हायचा तेव्हा होणार तेव्हा होतोच या निष्कर्षाला मी आलो. एवढी काळजी घेऊनही जर करोना होणार असेल तर काय म्हणायचं. आता करोनाची भीती संपली. तसंच करोना सोबत मधुमेह वगैरे अन्य आजार असूनही प्रकृती उत्तम असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं,” असं ते म्हणाले. तसंच आजारातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर प्लाझ्मा देण्याचाही संकल्प केला असल्याचं त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, देशात कोरोनाने थैमान घातले असून गुरुवारी प्रथमच कोरोनाचे २० हजार ९०३ रुग्ण आढळून आले असून, त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ६ लाख २५ हजार ५४४ झाला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा व कर्नाटक या पाच राज्यांमध्ये २४ तासांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली. या २४ तासांत महाराष्ट्रात ६३२८, तामिळनाडूमध्ये ४३४३, दिल्लीमध्ये २३७३, कर्नाटकात १५०२ तर तेलंगणामध्ये १२१३ जणांना बाधा झाल्याचे आढळले. आंध्रात रुग्णांची संख्या ८४५ ने वाढली. या सहा राज्यांतील रुग्णांची संख्या १७ हजारांच्या आसपास आहे. या सर्व राज्यांमध्ये बाधितांची संख्या १५ हजार वा त्याहून अधिक आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १ लाख ८६ हजार ६२६ झाली आहे.

आरोह वेलणकरला मिळतोय फिनालेसाठी प्रेक्षकांचा पाठिंबा

स्व.लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे करणार ‘या’ पक्षात प्रवेश

अक्षय कुमारने ‘लॉकडाऊन’ची तुलना ‘बिग बॉस’शोबरोबर…