कॉंग्रेसने मुख्यमंत्री पदाबाबत घेतलेली भूमिका पाहून तुम्हाला नक्की आश्चर्य वाटेल

blank

टीम महारष्ट्र देशा : महाशिवआघाडीतील नेत्यांची बैठक नुकतीच संपली. या बैठकीत ज्या मुद्य्यांवर चर्चा झाली त्या संबधीचा सविस्तर तपशील हाय कमांडला सदर केला जाईल. अशी माहिती कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांना दिली आहे.

ते म्हणाले, ” महाराष्ट्रातील विविध प्रश्न, शहर विकास, पायाभूत सुविधा व शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर ध्येय – धोरणे आखण्यासंबंधी विचार विनिमय झाला. महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीतील चर्चांचा तपशील हायकमांड ला दाखविण्यात येईल. त्यानंतर त्यातील बदल आणि दुरुस्त्या त्यांनी सुचविल्या नंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

तसेच, सत्ता स्थापन करणे हे महत्त्वाचे नसून राज्याला स्थिर सरकार देणे आणि ते योग्य पद्धतीने चालविणे हे महत्त्वाचे आहे. यावेळी त्यांना कॉंग्रेस मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याचा प्रश विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, कॉंग्रेस मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे महाराष्ट्राला राष्ट्रपती राजवटीतून बाहेर काढून लोकशाहीचा सक्षम पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. असेही ते यावेळी म्हणाले. तसेच सध्या सत्ता वाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नसून आधी राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्याचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, येत्या १७ नोव्हेंबर रोजी शरद पवार दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे महाशिवआघाडीच्या एकसूत्री कार्यक्रमाला अंतिम स्वरूप आले असून राज्यात लवकरच महाशिव आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे दिसत आहे.

महत्त्वाच्या  बातम्या :