केरळमध्ये ‘निपाह’ व्हायरसचे थैमान; सहा जणांचा मृत्यू

Nipah-Virus

मुंबई : भारतात निपाह व्हायरसने थैमान घातल आहे. या व्हायरसची लागण झाल्याने केरळच्या कोझिकोडमध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जणांवर उपचार सुरु आहेत. चिंतेची बाब म्हणजे, या विषाणूवर कोणताही उपचार होत नाही.

Loading...

दरम्यान, केंद्र सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. यासाठी कालच केरळला डॉक्टरांचं पथक दाखल झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा यांनी दिली. मृतांच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.

आणखी 25 जणांच्या रक्ताच्या तपासणीमध्ये ‘निपाह’ विषाणू असल्याचं निष्पन्न झालंय. विषाणूची लागण होऊ नये यासाठी खजूर खाणं टाळले पाहिजे, त्याबरोबरच जमिनीवर पडलेली फळं खाणं टाळावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. यावरुन राज्यभरात आरोग्य संस्थांना काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.या आजाराची लागण झाल्यानंतर रुग्ण 24 ते 48 तासामध्ये कोमात पोहोचवतात. आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीला श्वास घेण्यासाठी त्रास होतो, तर काही रुग्णांना न्यूरोलॉजिकल समस्याही होते.

1998-99 सालामध्ये हा आजार पसरला तेव्हा जवळपास 265 जणांना या आजाराची लागण झाली होती, असं बोललं जातं. रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या जवळपास 40 टक्के रुग्णांना गंभीर आजार झाला होता, ज्यामुळे त्यांना वाचवता आलं नाही. सर्वसाधारणपणे वटवाघूळ, डुक्कर किंवा मनुष्यांद्वारे हा आजार पसरतो. मलेशिया आणि सिंगापूरमध्ये डुक्करांच्या माध्यमातून हा आजार पसरल्याचं समजलं होतं, तर भारत आणि बांगलादेशमध्ये मनुष्यांपासूनच या आजाराचा संसर्ग होण्याची भीती जास्त आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...