fbpx

उस्मानाबाद लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडे उमेदवारांचा सुकाळ,उर्वरीत पक्षांकडे माञ दुष्काळ !

तुळजापूर- उस्मानाबाद लोकसभा निवडणूकी साठी राज्यपातळीवर विविध प्रमुख पक्षांकडून उमेदवारी कुणाला द्यावयाची याबाबतीत विचारमंथन चालु असल्याने फक्त राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवारांचा सुकाळ असुन उर्वरीत पक्षांकडे माञ उमेदवारांचा दुष्काळ असल्याने उमेदवार निवडी बाबतीत इतर पक्षांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे सध्याचे चिञ आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीसाठी युती आघाडी बाबतीत कुठलाही निर्णय झाला नसल्याने उमेदवार थांबा आणि वाट पहा या भूमिकेत आहेत.युती आघाडी झाली तर दुरंगी नाही झालीतर माञ चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर काही धनाढ्य उमेदवार माञ युती आघाडी निर्णयाची वाट पहात आहेत युती आघाडी बाबतीत निर्णय झाल्यानंतर माञ हे धनाढ्य उमेदवार अधिक सक्रिय होण्याचे संकेत आहेत.

उस्मानाबाद लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडे आ. राणाजगतिसिंह पाटील,अर्चनाताई पाटील बार्शीचे आ. दिलीप सोपल अशा दिग्गज उमेदवारांची फौज आहे तर सेनेचे विद्यमान खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांच्या कार्यकालाबाबातीत मतदारांमध्ये नाराजी असल्याने शिवसेनेला उमेदवार शोधावा लगणार आहे .

भाजपा कडे उमेदवार उपलब्ध नाही त्यांना मग आ. सुजितसिंह ठाकुर यांना मैदानात उतरावावे लागणार आहे पण आ. सुजीतसिंह ठाकुर हे तेवढेसे इच्छुक दिसत नाहीत,त्यामुळे भाजपला तगडा उमेदवार शोधावा लागणार आहे. अश्या परिस्थितीत शेवटचा पर्याय म्हणून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांना देखील पक्ष संधी देवू शकतो.

काँग्रेस पक्षाकडे या मतदार सघातील दिग्गज उमेदवार नसल्याने त्यांनाही उमेदवार शोधावा लागणार आहे .सध्या काँग्रेस कडून माजीगृहमंञी शिवराज पाटील चाकुरकर यांचे नावे चर्चत काँग्रेसने आणले आहे माञ काँग्रेसलाही माहीत आहे की आघाडी होवून जागा राष्ट्रवादीकाँग्रेस कडे जाणार आहे त्यामुळे त्यांच्याकडे उमेदवारांचा सध्या तरी वानवा आहे.

सध्या तडवळा येथील देवदत्त मोरे हे यांनी लोकसभा निवडणूक पक्षाकडून किंवा अपक्ष म्हणून लढविण्याचा निर्धार करुन त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे प्रमुख पक्षाकडून खास करुन सेनेकडून उमेदवार मिळवी यासाठी प्रयत्नशिल असुन जर कुण्याही पक्षांनी उमेदवारी नाही दिली तर शेतकरी संघटना किंवा इतर पक्षाची उमेदवारी घेवून अन्यथा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. त्याच बरोबर उद्योगपती शंकर बोरकर हे देखील सेनेकडून इच्छुक आहेत. उस्मानाबाद लोकसभेच्या निवडणूक चिञ युतीआघाडी निर्णयानंतरच स्पष्ट होणार हे मात्र नक्की.