fbpx

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी वाचवले अपघातग्रस्तांचे प्राण

टीम महाराष्ट्र देशा : उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा दिलदारपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रवास करत करत असताना त्यांनी एक अपघातग्रस्त गाडी पहिली आहे तत्काळ जखमींना मदत केली. त्यांच्या या मदतीमुळे जखमी लोकांना लवकरात लवकर दवाखान्यात पोहोचण्यास मदत झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे कळंब येथिल कार्यक्रम उरकुन ढोकी कडे येत असताना देवळाली येथील ज्योतीराम घाडगे यांचा देवळाली पाठीच्या पुढे एक्सीडेंट झाला होता. गर्दी पाहुन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गाडी थांबण्यास सांगितले यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास दादा पाटील व त्यांचे सहकारी यांनी जखमींना उचलून अंबुलन्सची वाट न पाहता स्वतःच्या गाडीतून त्याची रवानगी केली.

तसेच अंबुलन्स ढोकी येथे आली असता त्यात जखमींना जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे पाठवून डॉक्टर यांना फोन करून तात्काळ सेवा देण्याच्या सूचना केल्या. त्यामुळेच अडचणीच्या काळात सदैव मदतीचा हात पुढे करून सर्व सामन्यांसाठी तयार असणारे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर म्हणून त्यांची ओळख आहे.

दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून तत्कालीन विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना डावलून ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे शिवसेनेनी दाखवलेला विश्वास सार्थ करत त्यांनी विजय मिळवला होता.