येत्या ४८ तासात मान्सून दक्षिण अंदमानात धडकणार

मुंबई – ‘मेकुनू’चक्रीवादळामुळे अडथळा निर्माण झाल्याने मान्सूनचे अंदमानमधील आगमन लांबले होते. मात्र आता हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेने दूर गेले असून, मान्सून सक्रीय होण्याच्या दृष्टीने पुन्हा अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. येत्या ४८ तासात मान्सून दक्षिण अंदमानात दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़.

bagdure

दरम्यान याचा परिणाम म्हणून २७ मे रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़. तर २८ मे रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान वर्धा येथे ४६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़. तर २५ ते २८ मे दरम्यान विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे.

You might also like
Comments
Loading...