‘महाराष्ट्राचे नविन मॉडेल! उद्योगधंद्यांना बंदी, डान्स बारची चांदी!’

chitra wagh

मुंबई : एकीकडे राज्य सरकारने पायी वारीला परवानगी दिली नाही राज्यात अजूनही निर्बंध कायम आहेत. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका आहे. त्यातच एका वृत्तवाहिनीने ठाण्यात स्टिंग ऑपरेशन केले असता ठाणे शहरात बार सुरू असल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर यांच्यावर १०० कोटी रुपयांची खंडणी प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे.

‘महाराष्ट्राचे नविन मॅाडेल..‘उद्योग धंद्यांना बंदी, डान्स बारची चांदी’ करायचा असेल व्यवसाय तर द्यावा लागेल हफ्ता, नाहीतर कोविडचे नियम पाळा अन दुकानाचे शटर पाडा.. सामान्य व्यापारी कोमात, वसूली सरकार जोमात या शब्दांत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, रविवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी देशमुखांचे मूळ गाव काटोल येथील निवासस्थानी व नागपूर परिसरातील काही ठिकाणांवर छापे टाकले. तरीही देशमुखांशी संपर्क होऊ शाकला नाही. आता देशमुख ईडीच्या रडारवर आहे असे दिसून येते. चित्रा वाघ यांनी त्याच्यावर उपसाहात्मक टीका केली आहे. तसेच अनेक राजकीय पक्षांतून देशमुखांवर आणि महाविकास आघाडीवर या प्रकरणाला अनुसरून टीका होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP