पहा, हार्दिक पंड्या २२८ क्रमांकाची जर्सी घालून का खेळतो ?

Hardik pandya

मुंबई : स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताच 228 क्रमांकाची जर्सी घालून खेळत होता. त्यावेळी त्याच्या जर्सीचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पण आज ११ वर्षानंतर याचे उत्तर मिळाले आहे.

गुरुवारी आयसीसीने क्रिकेट फॅन्सला पंड्या 228या क्रमांकाची जर्सी घालून का खेळतो? असे ट्विट करून प्रश्न विचारला, तेव्हा क्रिकेटमधील प्रसिद्ध स्टॅटिशियन मोहनदास मेनन यांनी आयसीसीच्या या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. ‘हार्दिक पंड्या सोळा वर्षांखालील बडोदा संघाचा नेतृत्व करत होता. त्या मुंबईच्या संघाविरुद्ध विजय मर्चंट चषकामध्ये खेळताना द्विशतक ठोकले होते. या सामन्यात त्याने 228 धावांची बहारदार खेळी केली होती. रिलायन्स क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हार्दिकने त्याच्या कारकिर्दीमधले पहिलेच द्विशतक ठोकले होते’.

हार्दिक पांड्याने अतिशय कमी वेळात क्रिकेटविश्वात ठसा उमटविला आहे. त्याने 2016 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात प्रवेश केला होता. यानंतर, त्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीवर सतत प्रभाव पाडला आणि टीम इंडियाचा एक आवश्यक भाग झाला.