वीज बिलाचा आकडा पाहून रेणुका शहाणेला बसला शॉक; ट्विट करत व्यक्त केला संताप

renuka shahane

मुंबई : एकीकडे लॉकडाउनमुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले असताना अवाच्या सवा दराने वीज बिल येत असल्याने महावितरणविरोधात राज्यभरात संताप आहे. वाढीव वीज बिलाचा फटका फक्त सर्वसामान्यच नाही तर सेलिब्रेटींनाही बसत असल्याचं समोर आलं आहे.

अभिनेत्री रेणुका शहाणे हिने वीज बिलावर संताप व्यक्त केला आहे. अचानक वीज बिलाचा आकडा इतका फुगला कसा? असा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने केला आहे. रेणुकाने ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

‘मे महिन्यात माझे लाईट बिल ५५१० रुपये होते. त्यानंतर जून महिन्याचे २९,७०० रुपये आले. या महिन्याच्या बिलामध्ये मे आणि जूनचे एकत्र बिल देण्यात आले आहे. तुम्ही मे महिन्याचे बिल १८०८० रुपये दाखवले आहे. पण माझे बिल ५५१० रुपयांवरुन १८०८० रुपये कसे झाले?, असा सवाल तिने केला आहे. तिच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने देखील वीजबिलाचा 36 हजारांचा आकडा पाहून संताप व्यक्त केला होता. तापसीने आपल्या ट्विटमध्ये आधीच्या महिन्यांच्या वीज बिलाचे फोटोही जोडून भरमसाट वीज बिल आलं असल्याचं सांगितलं आहे.

माझ्या शेतकरी बांधवांचे मनापासून आभार मानतो – राज ठाकरे

कोरोनाच्या काळात पोलिसांनी शासनाची प्रतिमा उंचावली, गृहमंत्र्यांनी थोपटली पाठ

‘ पोलीस भरतीत पूर्वीप्रमाणेच प्रथम मैदानी आणि नंतर लेखी परीक्षा घेणार ‘