मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने धावपटू ललिता बाबर हिने मुख्यमंत्री सहायता निधीस केली मदत

Lalita babar

मुंबई : भारतीय महसुली सेवेत कार्यरत असलेले डॉ.संदीप भोसले आणि रिओ ऑलिम्पिकची फायनल गाठणारी मराठमोळी धावपटू ललिता बाबर या दाम्पत्याने आपल्या मुलाच्या म्हणजे रुद्रप्रताप ऊर्फ शंभुराजे याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५० हजार रुपयांची मदत केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुद्रप्रतापला त्याच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभाशिर्वाद दिले आहेत तसेच भोसले-बाबर दाम्पत्याने मुख्यमंत्री सहायता निधीत मदत जमा केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, बाबर यांनी राज्य आणि देशाचा नावलौकिक वाढवला असून संयम, शिस्त आणि मेहनतीच्याबळावर त्यांनी स्वत:च्या आयुष्यात यश संपादन केले आहे. आज अशाच संयम, शिस्त आणि समाजासाठीच्या समर्पणाची गरज आहे… एकजुटीने आपल्याला या संकटाचा मुकाबला करायचा आहे.

स्वत:बरोबर घरातील वडिलधाऱ्यांची आणि बालकांची काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे स्वच्छता, स्वयंशिस्त आणि शारीरिक अंतराचा निकष पाळायचा आणि कोरोनाला हरवायचं आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीतून मजुरांना घरी पाठवण्यासाठी आतापर्यंत ६७ कोटी देण्यात आले

#व्यक्तीविशेष : शंभर आमदारांच्या तोडीचा एकच भिडू.. नाव नामदार बच्चूभाऊ कडू

नवाजुद्दीन सिद्दीकीचे आणखी 2 चित्रपट रिलीजसाठी सज्ज