अहमदाबाद-मुंबई मार्गावरच्या तेजस रेल्वेगाडीला हिरवा झेंडा

नवी दिल्ली : अहमदाबाद-मुंबई दरम्यानच्या प्रिमियम तेजस गाडीला गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आज अहमदाबाद येथे हिरवा झेंडा दाखवला. 19 जानेवारीपासून ही गाडी प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.गुरुवार वगळता आठवड्यातले सर्व दिवस ही गाडी धावणार आहे. या गाडीला तात्काळ आणि प्रिमियम तात्काळ कोटा उपलब्ध राहणार नाही.

अहमदाबाद येथून सकाळी 6 वाजून 40 मिनीटांनी सुटणारी ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकात दुपारी 1 वाजून 10 मिनीटांनी पोहोचेल तर परतीच्या प्रवासात ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकातून दुपारी 3 वाजून 40 मिनीटांनी निघेल आणि अहमदाबाद येथे रात्री 9 वाजून 55 मिनीटांनी पोहोचेल. या गाडीला बोरीवली, वापी, सुरत, भरुच, वडोदरा आणि नादियाड येथे थांबे असतील.

Loading...

आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर आणि ‘आयआरसीटीसी रेल कनेक्ट’ या मोबाईल ॲपवर या गाडीसाठी आरक्षण उपलब्ध होईल. रेल्वेच्या आरक्षण खिडकीवर या गाडीचे आरक्षण करता येणार नाही. मात्र आयआरसीटीसीच्या अधिकृत एजंटमार्फत प्रवाशांना या गाडीचे आरक्षण करता येईल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...