लातूर काँग्रेसला ‘अच्छे दिन’,लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी

निलंगा/प्रा. प्रदीप मुरमे : लातूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडे तब्बल ५७ जणांनी उमेदवारीची मागणी केल्याने इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून आगामी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी मागणीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात काँग्रेसला निश्चितच ‘अच्छे दिन ‘आले आहेत.लातूर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा पारंपारीक मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा . १९७७,२००४ व २०१४ च्या निवडणूकीत या मतदारसंघात काँग्रेसला पराभवाच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले होते .

१९७७ मध्ये शेकापचे भाई उद्धवराव पाटील,२००४ मध्ये भाजपच्या श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर तर २०१४ मध्ये भाजपचे सुनील गायकवाड निवडून आले होते . या तीन निवडणुकीचा अपवाद वगळता सातत्याने या मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे . माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर हे तब्बल ७ वेळा या मतरसंघातून विजयी होण्याचा विक्रम केला आहे . त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा . लातूरचा हा गड परत मिळविण्यासाठी काँग्रेसला आगामी लोकसभा हि नामी संधी असेल .

Loading...

आगामी लोकसभेसाठी ५७ जणांनी उमेदवारीची मागणी केली असली तरी पक्षाचा उमेदवार कोण याबद्दल काँग्रेसमध्ये मोठी अनिश्चितता आहे . काँग्रेसचा गड असलेल्या या मतदारसंघाला मोदी लाटेत मोठा फटका बसला . खासदारकी गेली , जिल्हा परिषद व महानगरपालिकाही काँग्रेसने गमावली . एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थाही काँग्रेसने गमावल्या . पालकमंत्री असलेल्या संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून या मतदारसंघात विविध निवडणूकीच्या माध्यमातून ‘कमळा’चे वर्चस्व निर्माण करण्यात यशस्वी ठरले . तर दुसरीकडे लोकसभा,जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणूकीत झालेल्या धक्कादायक पराभवामुळे काँग्रेसचे युवा नेते आमदार अमितराव देशमुख बॅकफूटवर गेले .

दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या सेमी फायनलच्या विजयाने काँग्रेस पक्षात चैतन्य पसरले असून काँग्रेस नेतृत्वाचा विश्वास वाढला आहे . त्यामुळे भाजपला नव्हे तर काँग्रेसला अच्छे दिन आले आहेत . अमितराव देखील यास अपवाद नाहीत . परंतु भाजपचे वर्चस्व विचारात घेता आगामी निवडणूकीत हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यातून घेण्यासाठी अमितराव यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत . २००९ च्या निवडणूकीत लोकनेते तथा केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर व चाकूरकरसाहेब यांच्या सोबतीने कोल्हापूरच्या जयवंत आवळे या राजकीय मल्लाला लातूरच्या लोकसभा आखाड्यात उतरवून निवडून आणण्याची किमया केल्याचे सर्वश्रुत आहे.

सध्या जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाट,भा. ई . नगराळे ,शिवाजीराव जवळगेकर ,दत्तात्रय बनसोडे ,डॉ .कालगे आदी नावे चर्चेत आहेत . परंतु भाजपला शह देईल असा तगडा उमेदवार कोण द्यायचा हा काँग्रेस पुढील पेच आहे . आमदार देशमुख हे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव असल्यामुळे ते ठरवतील तोच उमेदवार राहणार आहे. त्यामुळे हाय कमांडकडून देशमुख यांनी सुचविलेल्या नावावर शिक्कामोर्तब होणार.आगामी निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराची नव्हे तर आमदार अमितराव देशमुख यांचीच प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शेवटच्या क्षणी आमदार देशमुख धक्कातंत्राचा वापर करत या ५७ जणांशिवाय एखादा नवीनच सक्षम उमेदवार देण्याची राजकीय खेळी खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही,हे मात्र निश्चित !

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत