केडगाव हत्याकांड प्रकरण; पोलीस कार्यालय तोडफोड प्रकरणी राष्ट्रवादीचे ४१ कार्यकर्ते पोलिसात हजर

crime

अहमदनगर : महाराष्ट्रात बहुचर्चित व धक्कादायक अशा अहमदनगर मधील केडगाव येथील झालेल्या शिवसैनिक दुहेरी हत्याकांड प्रकरणी चौकशीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात त्याच रात्री बोलावून घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड केली होती. सरकारी कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी सुमारे ३०० जणांवर गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झालेल्यांपैकी राष्ट्रवादीचे ४१ कार्यकर्ते सोमवारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाले होते, त्यांना न्यायालयात हजर केले

अटक केलेल्यांमध्ये माजी नगरसेवक निखिल वारे, आरिफ शेख आदींचा यामध्ये समावेश आहे. अहमदनगरमध्ये ७ एप्रिल रोजी केडगाव येथे शिवसेनेचे कार्यकर्ते संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, हे हत्याकांड झाल्यावर पोलीसांनी अधीक्षक कार्यालयात आमदार संग्राम जगताप यांना त्याच रात्री चौकशीसाठी बोलविले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अधीक्षक कार्यालयात घुसून तोडफोड केली होती. याप्रकरणी पोलीसांनी ३०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलीसांनी आतापर्यंत ४४ जणांना अटक केली असून, त्यांना जामीनही मिळालेला आहे. सोमवारी पोलीसांत हजर झालेल्यांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, त्यांना न्यायालयाने ३ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

Loading...

अटक केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नगरसेवक संपत बारस्कर, कुमारसिंह वाकळे, शेख अरिफ रफियोद्दिन, माजी नगरसेवक निखिल वारे, अविनाश घुले, वैभव ढाकणे, माजी उपमहापौर दीपक सूळ या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय अटक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नावे :- महेश जयसिंग बुचडे, केरप्पा रामचंद्र हुच्चे, सय्यद अब्दुल वाहिद, अशोक शिवाजी रोकडे, आवी शंकर बत्तीन, सागर बबन शिंदे, धीरज बबनराव उकिर्डे, समद वहाब खान, सुनील नारायण त्रिंबके, बबलू बन्सी सूर्यवंशी, सय्यद मन्सूर मुनीर, सुरेश टेकनदास मेहतानी, सुहास साहेबराव शिरसाठ, सैय्यद मतीन खोजा, प्रकाश बाबुराव भागानगरे

कुलदीप सुदाम भिंगारदिवे, दत्तात्रय लहानु तापकिरे, बाबासाहेब भाऊसाहेब गाडळकर, बीर उर्फ दिलदार सिंग अजय सिंग शेख, फारूक अब्दुल अजीज रंगरेज, चंद्रकांत महादेव औशिकर, अरविंद नारायण शिंदे, सत्यजित नंदू ढवण, वैभव कैलास जाधव, राहुल सतीश शर्मा, मयूर कन्हैय्यालाल बांगरे, किरण बाबासाहेब पिसोरे, घनश्याम दत्तात्रय बोडखे, बाबासाहेब कारभारी जपकर, राजेंद्र रामदास ससे, वैभव चंद्रकांत दारुणकर, अक्षय सतीश डाके, मयूर दिलीप कुलथे यांचा समावेश आहे.

या हत्याकांडानंतर अजूनही अहमदनगर शहरात तणावाचे वातावरण असल्याचे दिसून येत असून पोलीस आता काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे, तर अहमदनगर सुरक्षित राहावे अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल