कर्नाटकात भाजपचा पराभव ही हुकूमशाही व मनमानीच्या अंताची सुरुवात – राऊत 

Sanjay-Raut

नवी दिल्ली : सकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने बीएस येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीआधीच काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बहुमत सिद्ध करण्यासाठी १११ आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता. पण भाजपाकडे १०४ आमदार होते. बहुमतासाठी बरेच प्रयत्न करुनही सात आमदारांचा पाठिंबा जमवणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर येडियुरप्पांनी बहुमत चाचणीलासामोरे जाण्याआधी राजीनामा दिला.

बीएस येडियुरप्पा  यांनी राजीनामा दिल्यानंतर आता कॉंग्रेसने पाठींबा दिलेले कुमारस्वामी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. दरम्यान कर्नाटकातील भाजपचे नेते बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर कर्नाटक निवडणुकीवरून भाजपवर सातत्याने टीका करत आलेल्या शिवसेनेमध्ये मात्र जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.

Loading...

दरम्यान हुकूमशाही व मनमानीच्या अंताची ही सुरुवात आहे. कर्नाटकात जे घडले, ते लोकशाहीविरोधी होते. आपण कोणत्याही मार्गाने निवडणुका जिंकू शकतो व सत्ता आणू शकतो या विकृतीचा हा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी येडियुरप्पा यांनी दिलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर, माध्यमांना दिली.

तसेच कर्नाटकात भाजपचे गर्वहरण झाले आहे, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर राज्यपालांच्या निर्णयप्रक्रियेतील संदिग्धतेचा गैरफायदा घेण्याच्या प्रकाराला यानिमित्ताने आळा बसला आहे. पण कर्नाटकातील या घटनेच्या पाश्र्वभूमीवर त्रिशंकू विधानसभा असताना राज्यपालांनी कशा प्रकारे निर्णय घ्यावे यावर देशव्यापी विचारमंथन करण्याची वेळ आली आहे. अन्यथा असेच प्रकार पूर्वीही होत होते व यापुढेही सुरूच राहतील, असे देखील गोऱ्हे यांनी म्हंटले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना मिळाले स्थान
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'