विरोधकांचे आज सरकारविरोधात शक्ती प्रदर्शन

बंगळुरु : भाजप नेते येडियुरप्पा यांनी 19 मे रोजी बहुमत सिद्ध न करता आल्याने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान आता जेडीएसचे नेते एच डी कुमारस्वामी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल वजूभाई वाला हे कुमारस्वामींना पद आणि गोपनियतेची शपथ देतील.तर उपमुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे जी. परमेश्वर हे शपथ घेतील. त्यामुळे आजपासून कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार सत्तेवर येईल.

दरम्यान एच डी कुमारस्वामी यांच्या शपथग्रहण सोहळ्यानंतर नंतर विरोधक सरकार विरोधात जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असून, यानिमित्ताने भाजपा विरोधात एकजूट दाखवण्याची विरोधकांना नामी संधी आहे.

कुमारस्वामी यांनी देशभरातील नेत्यांना शपथविधीचं निमंत्रण दिलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह शरद पवार, अरविंद केजरीवाल, मायावती, चंद्राबाबू नायडू कमल हसन हे प्रमुख नेते उपस्थित राहणार असून यावेळी भाजपा विरोधात शक्ती प्रदर्शन करण्यात येईल.

You might also like
Comments
Loading...