Karnataka Election; भाजप जेडीएसशी युती करणार नाही – सदानंद गौडा

बंगळूरू – कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजप स्पष्ट बहुमताकड वाटचाल करत आहे. भाजप ११४ कॉंग्रेस ६२ तर जेडीएस ४८ जागांवर आघाडीवर आहे.

दरम्यान माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा जनता दल सेक्युलर (जेडीएस) किंगमेकर ठरण्याची शक्यता सर्वच मतदानोत्तर चाचणीत दिसून आली होती. परंतु, सध्याचे चीत्र पाहता भाजप बहुमत मिळवणार असल्याचं स्पष्ट झाल्याने जनता दल सेक्युलरच्या किंग मेकर होण्याच्या स्वप्नाला तडा गेलाय. दरम्यान भाजपाने आम्हाला जेडीएसची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी भाजपाने बहुमताचा आकडा पार केला असल्याने, आता जेडीएसशी आघाडी करण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगितले आहे.

You might also like
Comments
Loading...