कर्नाटकात २ वाजेपर्यंत ४० टक्के मतदान

EVM

बंगरुळु – आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून, दरम्यान काँग्रेस, भाजपा आणि जनता दल सेक्यूलर अशी तिरंगी लढत असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी दुपारी २ वाजेपर्यंत ४० टक्के मतदान झाले आहे.भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी.एस.येडियुरप्पा आणि जेडीएसचे प्रमुख देवेगौडा यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.विधानसभेच्या २२२ जागांसाठी सुमारे ५ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीच्या निकालाचे परिणाम देशाच्या राजकारणावर होणार असल्याने या निवडणुकीकडे देशभराचे लक्ष लागले आहे.

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वीची सेमीफायनल म्हणून कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे बघितले जाते. दक्षिण भारतात प्रवेश करण्यासाठी भाजपाला कर्नाटकमधील विजय महत्त्वाचा असून कर्नाटकमधील सत्ता कायम राखून प्रतिष्ठा टिकवण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे. निवडणुकीच्या प्रचारात भाजपा आणि काँग्रेसने एकमेकांवर विखारी टीका देखील केली होती. भ्रष्टाचारावरुन दोन्ही पक्षांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली होती.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
उद्धवची आणि संज्याची औकात काढली त्याबद्दल उदयनराजेंच अभिनंदन:निलेश राणे
संज्या म्हणजे लुक्का;संज्या राऊत म्हणजे 'पिसाळलेला कुत्रा':निलेश राणे
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
'अजित पवार हे सध्याच्या मंत्रिमंडळातील अत्यंत कार्यक्षम मंत्री असून ते  कामाला वाघ आहेत'
नितेश राणेंची जीभ घसरली संजय राऊतांवर केली अश्लाघ्य भाषेत टीका
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
'हा देश मोदी आणि अमित शाह यांच्या बापाचा नाही'
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का