जयकुमार गोरेंची अडचण वाढली; ‘माण’च्या जागेवर शिवसेना ठाम

टीम महाराष्ट्र देशा :  लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहेत. त्यानुसार भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली असून नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा धडाकाचं लावला आहे.

याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे माण मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत सोलापुरात पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणावर याचा परिणाम झालेला आहे. कारण येथून शिवसेनेकडून शेखर गोरे हे इच्छुक आहेत. आणि आता जयकुमार गोरे यांनी भाजपप्रवेश केल्यामुळे उमेदवारीसाठी चढाओढ पाहायला मिळत आहे.

यावरून शिवसेनेचे उपनेते, सातारा-सांगली संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांनी भाष्य केले आहे. त्यांनी माण विधानसभा मतदारसंघात शेखर गोरे हेच शिवसेनेचे उमेदवार असतील. याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी माहिती दिली त्यामुळे आता जयकुमार गोरे यांना उमेदवारी मिळणार की शेखर गोरे यांन मिळणार हे पाहन महत्वाचे ठरणार आहे.

तसेच पुढे बोलताना बानगुडे यांनी कराड उत्तरसह सातारा जिल्ह्यातील सहा मतदारसंघ शिवसेना पूर्ण ताकतीने लढवणार आहे. कराड उत्तर, माण, वाई, पाटण, फलटण, कोरेगाव हे मतदारसंघ सेना जिंकण्यासाठी लढणार आहे. कराड उत्तर मतदारसंघात नविन चेहऱ्याला उमेदवारी दिली जाईल. पक्ष बदल करणाऱ्या उमेदवाराला संधी देणार नाही अशी माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या