आपल्यावरील अब्रूनुकसानीचा खटला मागे घ्या; कुमार विश्वास यांचं जेटलींना पत्र

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी केलेल्या टिकेप्रकरणी अरुण जेटली यांनी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला होता. दरम्यान कुमार विश्वास यांनी अरुण जेटली यांना पत्र लिहून अब्रूनुकसानीचा खटला मागे घेण्याची विनंती केली होती. जेटली यांनी कुमार विश्वास यांचा माफीनामा स्वीकारत त्यांच्यावरील अब्रूनुकसानीचा खटला मागे घेतला.

या पत्रात कुमार विश्वास यांनी म्हंटल आहे की, आपण केजरीवालांच्या सांगण्यावरूनच जेटली आणि गडकरींवर टीका केली होती. मात्र “आमचा नेता खोटारडा होता. आम्ही त्यांचं सगळं म्हणणं आणि आरोप खरे मानयचो. पण त्यानेच सगळ्यांची माफी मागायला सुरुवात केली”. कुमार विश्वास यांच्या म्हणण्यानुसार, अरुण जेटली यांनी अब्रूनुकसानीचा खटला दाखल केल्यानंतर आपल्याला हवी असलेली कोणतीही कागदपत्रं केजरीवालांच्या कार्यालयातून देण्यात आली नाहीत. इतकंच नाही तर अरविंद केजरीवाल आपला फोनही घेत नाही आहेत. अशा परिस्थितीत ते खटला लढू शकत नाहीयेत.

म्हणून त्यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहून त्यांच्यावर केलेल्या आरोपांबद्दल माफी मागितली. तसेच आपल्यावर दाखल करण्यात आलेला अब्रूनुकसानीचा खटला देखील मागे घेण्याची विनंती केली होती. दरम्यान अरुण जेटली यांनी कुमार विश्वास यांचा माफीनामा स्वीकारत त्यांच्यावरील खटला मागे घेतला आहे.