fbpx

‘त्या’ गुन्ह्याची होणार नव्याने चौकशी; माणिक सरकार यांच्या अडचणी वाढणार

sunil-deodhar-manik-sarkar-

पुणे- २००५ साली माणिक सरकार यांच्या निवासस्थानी शोषखड्ड्यातून एक मानवी सांगाडा बाहेर काढण्यात आला होता ज्याची तत्कालीन सरकारने कोणतीही दखल घेतली नाही तसेच पोलिसांनी देखील कोणतीही कारवाई केली नाही आता आमचे सरकार आले असून या प्रकरणाचा पुन्हा योग्य प्रकारे तपास केला जाईल असं विधान भाजपच्या त्रिपुरा विजयाचे सुनील देवधर यांनी केलं आहे. तसेच जो बेईमानी से चुनकर जो आये ओ इमानदार हो नहीं सकता असं म्हणत भाजपनेते सुनील देवधर यांनी त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार आणि कम्युनिस्ट पक्षावर टीका केली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आज सुनील देवधर यांच्याशी वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.

२००५ साली माणिक सरकार यांच्या निवासस्थानी शोषखड्ड्यातून एक मानवी सांगाडा मिळाला होता ज्यानंतर मोठी खळबळ उडाली होती . मात्र या प्रकरणाची तत्कालीन सरकारने कोणतीही दखल घेतली नाही तसेच पोलिसांनी देखील कोणतीही कारवाई केली नाही आता आसत्तांतर झाले असून या प्रकरणाचा पुन्हा योग्य प्रकारे तपास केला जाईल असं असं देवधर म्हणाले.

जो बेईमानी से चुनकर जो आये ओ इमानदार हो नहीं सकता असं म्हणत माणिक सरकार यांच्या राज्यकारभारावर हल्ला चढवला. प्रामाणिकपणे कम्युनिस्ट पार्टीने त्रिपुरात निवडणुका कधीही जिंकल्या नाहीत असा आरोप देखील त्यांनी येवेळी केला. गरिबी राहिली पाहिजे ही कम्युनिस्टांची स्टेटर्जी असल्यामुळेच त्रिपुरात 67% लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत तसेच रोझ व्हॅली या चीटफंड कंपनीच्या आर्थिक घोटाळ्यांची देखील चौकशी केली जाईल तसेच माणिक सरकार या कंपनीवर का मेहरबान होते हे सुद्धा आम्ही जगासमोर आणू असं देखील ते म्हणाले.