fbpx

जम्मू-काश्मीर : लष्कराच्या कारवाईत ५ दहशतवाद्यांचा खात्मा

अल कायदा

श्रीनगरः जम्मू-काश्मीरच्या तंगधर सेक्टरमध्ये लष्कराने केलेल्या कारवाईत ५ दहशतवाद्यांना ठार करण्यात सैनिकांना यश आलं आहे. रमझानच्या महिन्यात सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये सैनिकांना शस्त्रसंधीचे आदेश दिले होते. मात्र दहशतवादी हल्ला झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल असं देखील स्पष्ट करण्यात आलं होतं.

दरम्यान पहाटेच्या अंधाराचा फायदा घेऊन दहशतवादी तंगधर सेक्टरमधून भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं जवानांच्या लक्षात येताच त्यांनी घेराव घालून गोळीबार केला यामध्ये ५ दहशतवादी ठार झाले आहेत. आता या संपूर्ण भागात जवानांनी ‘सर्च ऑपरेशन’ सुरू केलं आहे.

2 Comments

Click here to post a comment