खासगी सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात झाले इंदुरीकरांचे कीर्तन

अहमदनगर : समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी होते असे वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर गर्भलिंग निदानाची जाहिरात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहे. अशातच त्यांच्या या वक्तव्यावर राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे दिसून येत आहे. हभप इंदुरीकर महाराज देशमुख वादाच्या भोवर्यात सापडलेल्या असताना आज (ता. १५ ) नगर येथे खासगी बंदोबस्तात त्यांना कार्यक्रमाच्या स्थळी आणण्यात आले. खासगी सुरक्षारक्षकांच्या मदतीने महाराजांचे कीर्तन पार पाडले. यावेळी मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती.

Loading...

तर त्यांचे कीर्तन होणार की नाही, अशी त्यांच्या भक्तांमध्ये कुजबुज सुरू झालेली होती. आज नगर येथील भिंगार या गावातील श्री शुक्लेश्वर मंदिरामध्ये त्यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. त्यांच्या बंदोबस्तासाठी खासगी बॉक्सर नियुक्त करण्यात आले होते. व बंदोबस्तात त्यांना कीर्तनाच्या स्थळी आणण्यात आले. बघ्यांची गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणावर झालेली होती. दरम्यान यावेळी कीर्तन सुरू असताना कोणती शूटिंग करू नये अशा सूचना देण्यात आल्या होत्या.’

समतिथीला स्त्री संभोग केल्यास मुलगा होतो आणि विषमतिथीला केल्यास मुलगी होते, असे वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर गर्भलिंग निदानाची जाहिरात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. असे असतानाच त्यांनी काल एका कार्यक्रमात आपल्या विधानावर भाष्य करत स्पष्टीकरण दिलं. “दोन तासांच्या किर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे बोललो, ते चुकीचं नाहीच. मी बोललेलं अनेक ग्रंथात नमूद आहे. वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन” असं इंदुरीकर म्हणाले आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
एकनाथ खड्सेंचे निर्दोषत्व सिद्ध झाल्यास ; फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ?
'तृप्ती देसाईंवर अश्लील टीका इंदुरीकरांच्या सूचनेनुसारच' ; तासगावात तक्रार
भास्कर जाधव यांच्या नाराजीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून 'गंभीर' दखल
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत