औरंगाबादेत मुंबई-पुण्यापेक्षा पेट्रोल महाग

petrol disel

औरंगाबाद : शहरात इंधनाच्या भाववाढीचा नवा विक्रम गुरुवारी नोंदवला गेला. पहिल्यांदाच पेट्रोल ९२.३१ रुपये व डिझेल ८२.५७ रुपये प्रतिलिटर झाले. हळूहळू पेट्रोलची किंमत शंभरीकडे जात आहे. यामुळे महागाई आणखी वाढणार असल्याने सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. इंधन वितरण करणाऱ्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसी या तीन कंपन्या दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करीत असतात.

मंगळवारी तुलनेत बुधवारी पेट्रोल २५ पैसे, तर डिझेल २६ पैशांनी वधारले. पेट्रोल ९२.३१ रु., डिझेल ८२.५७ रुपये प्रतिलिटरने विकले जात होते. १ जानेवारीला पेट्रोल ९१.५३ रुपये, तर डिझेल ८१.७१ रुपये प्रतिलिटर विक्री केले जात होते; तर ७ जानेवारी रोजी पेट्रोल ९२.०५ रुपये, तर डिझेल ८२.२९ रुपये विकले जात होते. यामुळे आता मालवाहतूक भाडे वाढून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आणखी भडकतील व त्याचा आर्थिक फटका सर्वसामान्यांना बसेल.

औरंगाबादेत मुंबई-पुण्यापेक्षा पेट्रोल महाग

औरंगाबादपेक्षा मुंबई व पुणे महानगर महाग आहे, असे म्हटले जाते. मात्र, इंधनाच्या बाबतीत तसे नाही. औरंगाबादकरांना महानगराच्या तुलनेत जास्त रक्कम मोजावी लागत आहे. पेट्रोल लिटरमागे १.२४ रुपये ते १.५६ रुपये, तर डिझेल ९७ पैसे ते २.७७ रुपये जास्त देऊन खरेदी करावे लागत आहे. मुंबईत पेट्रोल ९१.०७ रुपये, डिझेल ८१.३४ रुपये; तर पुण्यात पेट्रोल ९०.७५ रुपये, डिझेल ७९.८० रुपये प्रतिलिटर विकत आहे.

महत्वाच्या बातम्या