‘येवले चहा’ विरुद्ध जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत’

टीम महाराष्ट्र देशा – कुठलाही भेसळीचा प्रकार येवले चहा मध्ये केला जात नाही तसेच FDA कडून आम्हाला एकही नोटीस किंवा सूचना याबाबत आलेली नाही, असं स्पष्टीकरण येवले चहाचे संचालक नवनाथ येवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

सिंथेटिक कलर भेसळीच्या बातम्यांबद्दल येवले म्हणतात, मला सोशल मीडिया आणि काही मित्रांच्या कॉलवरून समजल की येवले अमृततुल्य मध्ये भेसळ आढळली अश्या बातम्या येत आहेत. मी सर्व ग्राहकाना विश्वास देतो असा कुठलाही भेसळीचा प्रकार येवले चहा मध्ये केला जात नाही. तसेच FDA कडून आम्हाला एकही नोटीस किंवा सूचना या बाबद आलेली नाही.

Loading...

दरम्यान त्यांनी हे सर्व आरोप आणि अफवा येवले चहाला बदनाम करण्यासाठी केले जात असल्याचे म्हटले. काही लोक किंवा समूह जाणीवपूर्वक येवले चहा ला बदनाम करण्याच्या हेतूने या प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत असे ते म्हणाले. एका सामान्य यद्योजकाला मागे खेचण्याचे हे षडयंत्र कधीही यशस्वी होणार नाही कारण आम्ही कसलीही भेसळ करत नाही. हे आधीही स्पष्ट केले आहे, आणि आताही तेच सांगत आहोत . तसेच आम्ही आमच्या माय बाप ग्राहकांच्या आरोग्याशी कधीही खेळणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केल.

तसेच काही दिवसापूर्वी येवले चहामध्ये मेलामाईन असल्याच्या प्रकरणाचा उल्लेख करत नवनाथ येवले म्हणाले, ‘मागे काही दिवसांपूर्वी येवले चहा मध्ये मेलामाईन चा वापर होतो म्हणून समाज माध्यमंमध्ये अफवा पसरवली होती. त्यानंतर FDA च्या कारवाई मध्ये व तपासणी मध्ये येवले चहा मध्ये मेलामाईन किंवा कुठलाही आरोग्यास घातक पदार्थ आढळला नाही असा रिपोर्ट आम्हाला मिळाला आहे.’

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात