NEETपरीक्षा : भलीमोठी नियमावली जाणून घ्या, अन्यथा परीक्षा देता येणार नाही

NEET-Dress-Code 1

टीम महाराष्ट्र देशा- सीबीएससीने यंदाच्या NEET परिक्षेसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये परिक्षार्थींनी परिक्षेला येताना कुठले कपडे परिधान करायचे, कुठले नाही. तसेच कोणत्या वस्तू सोबत बाळगू नयेत, याची भलीमोठी यादी जाहीर केली आहे. या नियमावलीत सांगितल्याप्रमाणे ड्रेसकोड जर परीक्षार्थीचा नसेल तर परिक्षार्थींना परिक्षेला मुकावे लागू शकते.NEETने नुकतेच परिक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध केले आहे. त्यानंतर आता ही परिक्षा देणाऱ्या देशभरातील परिक्षार्थींना नवा ड्रेसकोड जाहीर करण्यात आला आहे.

Loading...

असा असेल नवा ड्रेसकोड

  • परिक्षार्थींना फिक्या रंगाचे कपडे परिधान करण्यास प्राधान्य, पूर्ण बाह्यांचे शर्ट किंवा कुर्ता घालता येणार नाही. त्याऐवजी अर्ध बाह्यांचे शर्ट घालायचे आहेत.
  • कपड्यांवर मोठ्या आकारातील बटन्स, बॅच किंवा फूल लावता येणार नाही. मुलींनी शक्यतो पारंपारिक सलवार कमीज किंवा ट्राऊजर वापरता येणार आहे.
  • पायात शूज आणि पायमोजे घालता येणार नाहीत. त्याऐवजी सँडल किंवा चप्पल वापरता येईल.
  • परिक्षा केंद्रांवर परिक्षार्थींचे सामान ठेवण्याची कुठलीही सुविधा असणार नाही. त्यामुळे त्यांना सोबत पेन्सल बॉक्स, हँडबॅग, बेल्ट, टोपी, घड्याळ आणि ज्वेलरी सोबत बाळगता येणार नाही.
  • ज्या परिक्षार्थींना पारंपारिक कपड्यांमध्ये यायचे आहे. त्यांना परिक्षा केंद्रावर एक तास आगोदर यावे लागेल. संपूर्ण तपासणीनंतरच त्यांना परिक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे.
  • गतवर्षी डोक्यावर बांधलेला कपडा (पगडी, टोप्या) आणि हिजाब काढण्यास परिक्षार्थींना सांगण्यात आले होते. यावरुन मोठे वादंगही माजले होते. परिक्षेत कुठल्याही प्रकारे कॉपीचे प्रकार होऊ नयेत म्हणून ही कडक खबरदारी घेण्यात आली आहे.
Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
रावसाहेब दानवेंचे जावई मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीला
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ