नवीन आकृतिबंध आणि जुने सेवा भरती नियम असे चालणार नाही- मनपा आयुक्त

औरंगाबाद : कार्यकारी अभियंता व आरोग्य वैद्यकीय अधिकारी आस्थापनेवरील पदे पदोन्नतीने भरण्यात यावी अशी मागणी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी संघटनेने प्रशासक तथा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय यांच्याकडे केली आहे. यावर पांडेय यांनी महापालिकेत नोकर भरती आणि पदोन्नतीची प्रक्रिया नवीन सेवाभरती नियमानुसारच होईल. नवीन आकृतिबंध आणि जुने सेवा भरती नियम असे चालणार नाहीत अशी भूमिका स्पष्ट केली.

महापालिकेचे अधिकारी कर्मचारी संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शासनमान्य सेवाभरती नियमानुसार कार्यकारी अभियंता व आरोग्य वैद्यकीय अधिकारी ही महापालिका आस्थापनेवरील रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात यावीत. डॉ. नीता पाडळकर यांच्याकडे या पदाचा तीन वर्षांपासून अतिरिक्त कार्यभार आहे. आवश्यक ती पात्रता त्या धारण करतात. त्यामुळे त्यांची पदोन्नतीने नेमणूक करा. दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या कार्यकारी अभियंता या पदावर उप अभियंता ए. बी. देशमुख हे काम पाहतात.

विभाग प्रमुख हे पद कार्यकारी अभियंता या पदाशी समकक्ष पद आहे. त्यामुळे देशमुख यांची पदोन्नतीने नियुक्ती करावी. १९९४ मध्ये मंजूर झालेले सेवा भरती नियम सध्या अस्तित्वात आहेत. त्या आधारे ही पदोन्नती नियुक्ती करण्यात यावी. दरम्यान या संदर्भात पांडेय यांनी सांगितले की, नवीन सेवा भरती नियम नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजुरीसाठी सचिवांनी पाठवले आहे. नगर विकास मंत्र्यांच्या मंजुरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंजुरी मिळेल. शासनाने महापालिकेचा आकृतिबंध मंजूर केला आहे आकृतिबंध नवा आणि सेवा भरती नियम जुने असे चालणार नाहीत असे पांडेय म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP