धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का

टीम महाराष्ट्र देशा – विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ताबदल झाला. यानंतर झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडें यांनी पंकजा मुंडेंना धक्का दिला होता.

त्यानंतर आता पुन्हा जिल्हा परिषदेच्या चारही सभापती पदावर धनंजय मुंडें गटाच्या सदस्यांनी विजय मिळवला. यामुळे आधी भाजपची एक हाती सत्ता असलेल्या बीड जिल्हा परिषदेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा आपले वर्चस्व निर्माण केलं.

Loading...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना जोरदार धक्का देत जिल्हयात वर्चस्व निर्माण केलं आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर राष्ट्रवादीने आपले वर्चस्व सिद्ध केल्यानंतर, आता पुन्हा सभापती पदावरही राष्ट्रवादीचे चार सदस्य बिनविरोध निवडून आणले आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि सभापती पद एवढंच नाही तर जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्या धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या  ताब्यात आल्या आहेत. त्यामुळे आता बीड जिल्ह्यात धनंजय पर्व सुरु झालंय असं त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण