कर्जमाफीसाठी आता नवीन डेडलाईन; डिसेंबर अखेर कर्जमाफीचा लाभ मिळणार – सुभाष देशमुख

loan waiver will be done before Diwali - Subhash Deshmukh

टीम महाराष्ट्र देशा: शेतकरी कर्जमाफीसाठी तारीख पे तारीख होताना दिसत आहे. आता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी डिसेंबर अखेरपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याच सांगितल आहे. दरम्यान सरकारमधील मंत्र्यांकडून वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात असल्याने मोठा संभ्रम निर्माण होताना दिसत आहे.

राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले. मात्र यामध्येच मोठा घोळ झाल्याने कर्जमाफी नेमकी कधी मिळणार हे कळत नाही.  याबाबत सरकारवर विरोधी पक्षांकडून कडाडून टीका केली जात आहे. दरम्यान आघाडी सरकारच्या काळात 2007 मध्ये कर्जमाफीला 11 महिने लागले तर बीजेपी सरकारने 4 महिन्यात कर्जमाफी दिली. पारदर्शक कारभारामुळे कर्जमाफीला थोडासा वेळ गेला असल्याचे देशमुख यांनी म्हटलं आहे.