CRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी? – अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा – पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. संपूर्ण जगभरात या हल्ल्यानंतर संतापाची लाट उसळली असून पाकड्यांचा निषेध केला जात आहे. ही घटना ताजी असतानाच बारातीमधील पोलिसांनी एका CRPF जवानाला खोलीत डांबून मारहाण केल्याचो घटना समोर येत आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “पोलिसांना जवानांना मारण्याचे अधिकार दिलेत का? दोषींना योग्य धडा मिळाला पाहिजे. कायदा सुव्यवस्थेचं राज्य राहिलं नाही. अवैध धंदे चालतात, त्यावर कारवाई करावी ना. चुकीच्या प्रवृत्तीवर कारवाईचा बडगा उगारला पाहिजे. नको तिथे पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी?”, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. तसेच, “पोलिसांनी केलेल्या मारहाणीबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असून, शरमेने मान खाली घालायला लावणारं कृत्य आहे.” अशी खंतही अजित पवारांनी व्यक्त केली.

सीआरपीएफ जवान अशोक इंगवले हे वर्दीत होते. तरीही बारामती तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि पोलिसांनी सीआरपीएफच्या जवानाला खोलीत डांबून मारहाण केली.