औंरगाबाद : कोरोना संसर्गामुळे आधीच ग्रासलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच जात आहेत. कोरोना संसर्गामुळे बारावी बोर्ड परिक्षेतील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप नेमके कसे असेल यावरून संभ्रम कायम असतानाच जेईई मेन्स परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणीत अजून भर पडली आहे.
कोरोना संसर्गामुळे दरवर्षी बारावी बोर्ड परीक्षा दरवर्षाप्रमाणे फेब्रुवारी-मार्च महिन्यात न घेता एप्रिल-मे महिन्यात घेण्यात येणार आहे. त्यात कमी केलेला २५ टक्के अभ्यासक्रम हा पाठ्यक्रमाने नाही तर पाठ्यक्रमातील काही उतारे कमी केलेला आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्ण अभ्यास करावा लागतोय. यात बोर्ड परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपावरुन गोंधळ अजुनही तसाच आहे. पण बारावी बोर्ड परिक्षा उशिरा होत असल्याने विद्यार्थ्यांची जेईईची एक संधी हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कारण दरवर्षी विद्यार्थी बारावी नंतर सीईटी, नीट, जेईईची तयार करतात. परंतु कोरोनामुळे जेईई मेन्स परीक्षा प्रथमच फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात चार वेळा घेण्यात येणार आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या जे विद्यार्थी जेईई मेन्स देतील त्यांना अडचण येणार नाही. मात्र जेईई परिक्षेचा दुसरा टप्पा १४ जे १८ मार्च आणि तिसरा २७ ते ३० एप्रिल असा आहे. या दोन्ही परीक्षा एकाचवेळी आल्याने विद्यार्थ्यांची मात्र चांगलीच अडचण झाली आहे. यामुळे एप्रिल-मे महिन्यात दोन्ही परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांची जेईई मेन्सची एक संधी हुकण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनामुळे सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू; जालन्यात ११७ नव्या रुग्णांची भर
- खुशखबर! नांदेड विभागात एप्रिल महिन्यापासून सहा गाड्या धावणार
- मराठवाड्यात ६०५, औरंगाबादेत सर्वाधिक २४० रुग्णांची भर; १९७ कोरोनामुक्त, चौघांचा मृत्यू
- मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना वीजबिलात सूट द्यावी; उद्योजक संघटनांची मागणी
- मद्यधुंद कारचालकाने रिक्षाचालकासह दुचाकीस्वाराला उडवले; औरंगाबादेत रात्री भीषण अपघात