अकबराच्या नावाने असलेल्या रस्त्यावर हिंदू सेनेने लावलेल्या पोस्टर्सवरून नवा वाद

akbar

नवी दिल्ली: हिंदु सेनेने दिल्लीतील अकबर रोडवर वेगवेगळ्या ठिकाणी काही पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर्समुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सुरुवातीला ‘अकबर द ग्रेट’ असे लिहलेल्या पोस्टर्स च्या जागी हिंदू सेनेने हे वादग्रस्त पोस्टर्स लावले आहेत.

पोस्टरमध्ये असे लिहिले गेले आहे की अकबर हा महान असल्याचे म्हटले जाते, तो खरंतर बलात्कारी आणि दहशतवादी आहे. आपल्या कारकिर्दीत अकबरने हजारो हिंदू मुलींवर बलात्कार केले होते आणि हिंदूंचीही हत्या केली होती अशा आशयाची हिंदू सेनेने ही पोस्टर्स लावली आहेत.

हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली पोलिसांच्या बॅरिकेडिंगवर देखील पोस्टर चिकटवले आहेत आणि अकबर रोडचे नाव रेपिस्ट अकबर मार्ग आणि दहशतवादी अकबर मार्ग असे ठेवले आहे. पोस्टरवर हिंदु सेना आणि सुरजित यादव यांची नावे छापली आहेत.

महत्वाच्या बातम्या