राजस्थानमध्ये सापडला खरा कॉंग्रेसप्रेमी मुलाचे नाव ठेवले ” कॉंग्रेस ”

congress-flag

टीम महाराष्ट्र देशा : विनोद जैन या राजस्थानमधल्या एनएसयूआयचे जिल्हा महासचिव पदावरुन आपल्या राजकीय करिअरची सुरुवात करणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्याने आपल्या मुलाचे चक्क ‘ कॉंग्रेस ‘ ठेवले आहे. अशोक गहलोत यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या टीमचा विनोद सदस्य आहे.vi

या नावामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा आहे.नुकतेच त्याने आपल्या मुलाचे बर्थ सर्टिफिकेट काढले यावरही त्याने आपल्या मुलाचं नाव काँग्रेस ठेवलं आहे. १८ जुलै रोजी विनोदला मुलगा झाला होता. त्याने त्यांच्या मुलाचं नाव काँग्रेस जैन असं ठेवलं आहे.

विनोद जैनला नुकतेच आपल्या मुलाचे बर्थ डे सर्टिफिकेट मिळाले. मुलाचं नाव काँग्रेस ठेवल्याने त्याच्या कुटुंबीयानी आणि मित्रांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. पण विनोद मात्र कुणाचे ऐकण्यास तयार नाही. त्याचे काँग्रेस पक्षावर एवढे प्रमे आहे की त्याने मुलाचं नाव काँग्रेस ठेवलं

“माझा मुलगा जेव्हा मोठा होईल तेव्हा संपूर्ण देशात तो काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असेल”, असं विनोद जैनने सांगितले.