शिष्यवृत्ती योजनेसाठी नवीन महाविद्यालयांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

scholarships

मुंबई : केंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनेंतर्गत महाविद्यालय आणि संस्थांना शिष्यवृत्ती देण्यात येते. सन 2018-19 च्या शिष्यवृत्ती योजनेसाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलच्या www.scholarships.gov.in या होमपेजवरील सर्च इन्स्टिट्यूट, स्कुल आणि आयटीआय या लिंकवर दिसत नसेलल्या महाविद्यालय आणि संस्थांनी आपले नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुक महाविद्यालयांनी 31 मार्च पर्यंत संबंधित संकेतस्थळावर नोंदणी करावी असे उच्च शिक्षण संचालनालयाच्या www.dhepune.gov.inया संकेतस्थळावर परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे.