छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री भूपेश बागेल नक्की कोण ?

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला विजय मिळाला पण मुख्यमंत्री निवडताना मात्र राहुल गांधी यांना कसरत करावी लागली. कारण चार चार दावेदार असताना नक्की मुख्यमंत्री कोण हे ठरविणे अवघडच होते. भूपेश बाघेल , टी. एन. सिंह देव, ताम्रदाज साहू आणि चरणदास महंत हे चार नेते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. पण राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री पदाची माळ बागेल यांच्याय गळ्यात घातली आहे.

भूपेश बागेल हे सध्या छत्तीसगड प्रदेश कॉंग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखालीच कॉंग्रेसने विधानसभा निवडणूक पक्षाने लढविली होती. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी तेच प्रमुख दावेदार होते. स्वत: राहुल यांनीही त्यांच्यावर विश्वास टाकला होता.

भूपेश बागेल यांचा जन्म 23 ऑगस्ट 1961 रोजी शेतकरी कुटुंबात झाला. बागेल घराण्याचा दबदबा पूर्वीपासूनच आहे. भूपेश बागेल ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात. भूपेश बागेल यांनी१९८० दरम्यान राजकारणाला सुरूवात केली. १९८५ मध्ये युवक कॉंग्रेसचे दुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर ते मध्यप्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष देखील झाले. (छत्तीसगड पूर्वी मध्यप्रदेश मध्येच होते).१९९३ साली पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. भूपेश बागेल हे दिग्वीजयसिंह यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिही होते. पुढे त्यांना बढती मिळाली 1999 साली परिवहनमंत्री बनले.

छत्तीसगड या नवीन राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते २००३ मध्ये पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. पण राज्यात भाजप सत्तेवर आली. भाजपचे रमनसिंह मुख्यमंत्री बनले. त्यावेळी बाघेल हे विरोधी पक्षनेते होते. २००८ च्या निवडणुकीत मात्र भूपेश बागेल यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर पुन्हा २००४ मध्ये दुर्ग तर २००९ मध्ये रायपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांना पराभवाचा धक्का बसला.

छत्तीसगड मध्ये १५ वर्षे भाजप सरकार होते. रमणसिंह मुख्यमंत्री होते. पण कॉंग्रेस नेत्यांनी संघर्ष सुरु ठेवला. २०१८ च्या या विधानसभा निवडणुकीत जनतेने कॉंग्रेसला कौल दिला. राज्यात कॉंग्रेसला यश मिळवून देण्यात प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांचा महत्वाचा वाटा आहे. ते स्वत: देखील पाटण मतदारसंघातून विजयी झाले आहे. त्यांच्या संघर्षाचे फळ म्हणून कॉंग्रेसच्या या बागेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आहे.Loading…
Loading...