राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आज पालघरमध्ये

पालघर – भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघरमध्ये पोटनिवडणुका होणार असून, येत्या 28 तारखेला या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आज पालघरच्या दौऱ्यावर आहेत.

पालघर लोकसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतसा पालघर लोकसभा पोट निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. सर्वच पक्ष आपला उमेदवार कसा निवडून येईल यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत.

भाजपने कॉंग्रेसमधून आयात केलेले आपले उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पालघरच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी 11 वाजता डहाणू तालुक्यातील कासा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा झाली. तर संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री वसई येथे प्रचार सभा घेतील.

You might also like
Comments
Loading...