आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सुवर्ण दिवस : छगन भुजबळ

टीम महाराष्ट्र देशा : येवला लासलगाव मतदारसंघात सन २००४ साली प्रतिनिधित्व केल्यानंतर येवल्याला पाणी आणण्याचे जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न आज पूर्ण होत असून आज माझ्या आयुष्यातील हा एक सुवर्ण दिवस आहे, असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

यावेळी पुढे छगन भुजबळ म्हणाले, गेल्या ४४ वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या कालव्याला पाण्याची प्रतीक्षा होती. यासाठी मांजरपाड्याचा प्रकल्प साकार करून पुणेगाव कालव्यातून पाणी दरसवाडी धरणात आले आणि या कालव्यातून पाणी येवल्याच्या दिशेने प्रवाहित झाले, असे भुजबळ म्हणाले.

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, माझ्या आयुष्यातील जे काही सुवर्ण क्षण आले. त्यातील आजचा हा दिवस माझ्यासाठी सुवर्ण क्षण आहे असून येवला लासलगाव मतदार संघात निवडून आल्यानंतर येवल्याला पाणी आणण्याचे जे स्वप्न पाहिले अखेर पूर्ण झाले, असे भुजबळ म्हणाले.

Loading...

कालव्याच्या या अनेक अडचणी पार करत पाणी येवल्याला येत आहे. ‘प्रयत्ने वाळूचे कण रागडीता तेलही गळे’ऐवजी ”प्रयत्ने मांजरपाड्याचे पाणी येवल्याला जाई” अशी नवीन उक्ती आता सांगितली जाईल. येवल्यातील नागरिकांनी विश्वासआणि हिम्मत दिली त्यामुळे हे शक्य झाले आहे. किमान एक महिना पाणी चालेल असा अंदाज आहे. त्यामुळे येवल्याच्या लोकांना पाणी देण्याचे हे स्वप्न आपण पूर्ण करू शकलो यापेक्षा अधिक आनंद कोणताच नाही, असे देखील भुजबळ म्हणाले.