व्हायरल तापाची ‘ही’ आहेत लक्षणे

टीम महाराष्ट्र देशा : अनेकांना व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप येतो. या तापाबरोबरच सर्दी, खोकला, अंगदुखीसारखे आजारही अनेकांना होतात. या तापात रोग प्रतिकारशक्ती कमी करते. विषाणू संसर्गामुळे होणाऱ्या व्हायरल तापाचे स्वरूप आता वेगाने बदलत आहे.

त्यामुळे चार ते पाच दिवस असणाऱ्या तापाचा मुक्कामही वाढला असून, ही मुदत आता आठ ते नऊ दिवसांवर आली आहे. तसेच इतरही आजारांची लागण लवकर होऊ शकते. व्हायरल तापाची लक्षणे कोणती आणि त्यावर काही घरगुती उपाय कोणते आहेत. याविषयी माहिती जाणून घेऊया.

व्हायरल तापाची काही विशीष्ट लक्षणं शरीरात दिसून येतात. यात घसा दुखण, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, सांधेदुखी उलट्या आणि अतिसार सुरु होतो. निसर्गोपचार कधीही उत्तम व्हायरल तापावर तातडीने उपचार सुरु करायला हवेत.

स्वाइन फ्लूच्या निदान चाचण्या करण्यापूर्वीच आता तापाची लक्षणे तशी असतील तर औषध सुरू करतात. अनेकदा हा ताप व्हायरलसारखा दिसतो, पण त्याचे निदान होऊन औषधोपचार सुरू होईपर्यंत बरेच दिवस वाया जातात. पहिल्या ७२ तासांमध्ये हे औषध सुरू केल्यास त्याचा प्रभाव व फायदा अधिक असतो. वैद्यकीय सल्ला तर घ्यावाच. पण त्या जोडीला काही घरगुती उपचार करून पाहता येतील.

महत्वाच्या बातम्या