लोकसभा, विधानसभा पोटनिवडणूक; लोकांनी मोदींना नाकारलं – अरविंद केजरीवाल

नवी दिल्लीः लोकसभेच्या चार आणि विविध राज्यांतील विधानसभांच्या १० मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. त्यापैकी पालघरमध्ये जरी भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित विजयी झाले असले. तरी देखील देशतील इतर ठिकाणी मात्र भाजपला पराभवाचा सामना करावा लागलाय.

यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. देशभरात मोदी सरकारविरोधात असलेल्या जनतेच्या संतापाचे प्रतिबिंब आजच्या निकालांमधून उमटत आहे. आातापर्यंत लोक विचारत होते की पर्याय काय आहे. पण आता लोक म्हणतात की मोदीजी पर्याय नाहीत, आधी त्यांना हटवा. असा निशाना त्यांनी या निकालावरून मोदींवर साधला आहे.