लोडशेडिंगच्या मुद्यावरुन तोडफोड-जाळपोळ झाली तर आम्ही जबाबदार नाही : आव्हाड

Jitendra-Awhad

टीम महाराष्ट्र देशा- लोडशेडिंगवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कायदा हातात घेण्याची भाषा केली आहे. मुंब्र्यात आठ ते नऊ तास लोडशेडिंगनंतरही वीज नसल्याने, जाळपोळ आणि तोडफोड झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. आव्हाडांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे.

दिवाळीच्या तोंडावर राज्यावर भारनियमनाचे संकट आहे. चंद्रपूर, खापरखेडा, परळी, नाशिक, भुसावळ येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात कोळशाचा तुटवडा आहे. त्यामुळे भारनियमन सुरु झालं आहे. ४०० ते ५०० मेगावॅट वीजेचा तुटवडा आहे. अशात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लोडशेडिंगवरून जाळपोळ-तोडफोड झाल्यास आम्ही जबाबदार नाही असा इशाराच देऊन टाकला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्यांनी एक ऑडिओ क्लिप पोस्ट केली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ते महावितरणच्या अभियंत्याला झापत आहेत असेच दिसते आहे.

संत तुकारामांचा खून झाला होता; जितेंद्र आव्हाड यांच्या विधानामुळे वारकरी संतप्त

जितेंद्र आव्हाडांचे ‘गीता’यन, भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष आव्हाडांना भेट देणार भगवतगीता

मूळ आरक्षण असलेल्या जाती-जमातींचेच आरक्षण रद्द करण्याचा सरकारचा डाव – जितेंद्र आव्हाड