भारत बंद: अॅम्ब्युलन्सला वाट न मिळाल्याने नवजात बालकाचा मृत्यू

bihar vaishali death

टीम महाराष्ट्र देशा- अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आज संपूर्ण देशभरात विविध संघटना व राजकीय पक्षांद्वारे पुकारण्यात आलेल्या पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अतिशय संतापजनक अशी घटना समोर आली आहे. भारत बंदमुळे सोमवारी बिहारच्या वैशाली जिल्ह्यात एका नवजात बालकाचा मृत्यू झाला. या बालकाचा जन्म महानारच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात झाला होता. गंभीर अवस्था झाल्याने उपचारांसाठी त्याला हाजीपूरच्या सरकारी रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. बालकाला घेऊन त्याची आई अॅम्ब्युलेन्सने हाजीपूरला गेली, परंतु महानारच्या आंबेडकर चौकात अॅम्ब्युलेन्सला बंद समर्थकांनी रोखले.

Loading...

न्यूज 18 या हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार,नवजात अर्भकाला कडेवर घेऊन आई अॅम्ब्युलन्स वाट देण्याची विनवणी करत राहिली, परंतु तिचे कुणीही ऐकले नाही. आंदोलनामध्ये अॅम्ब्युलेन्स अडकून पडली आणि नवजाताचा मृत्यू झाला. दरम्यान,अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आज संपूर्ण देशभरात दलित-आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात या बंदला हिंसक वळण लागले असून ठिकठिकाणी रास्तारोको, रेल्वेरोको करण्यात आला आहे. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या असून बंद दरम्यान आतापर्यंत देशभरात ६ जण ठार झाले आहेत. त्यात मध्य प्रदेशातील चौघांचा तर यूपी आणि राजस्थानमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

मध्य प्रदेशमधील मुरैना जिल्ह्यात आंदोलनाला दुपारी हिंसक वळण लागले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांच्या गोळीबारात एकाचा तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र, गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच जमाव आणखी आक्रमक झाला. शेवटी पोलिसांनी मुरैनात कलम १४४ लागू केला. यानुसार परिसरात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले. तर सागर व ग्वाल्हेर या भागातही जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या घटनेनंतर परिसरात पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठमध्येही जमावाने चार बसेस जाळल्या.

पंजाबमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असून तिथे शाळा, औद्योगिक कार्यालये बंद आहे. पंजाबमधील सीबीएसईचे दहावी आणि बारावीचे आज होणारे पेपरही पुढे ढकलण्यात आले आहेत.बिहारच्या फोरबीसगंज येथे आंदोलकांनी रुळावर उतरुन रेल रोको आंदोलन केले.राजस्थानच्या बारमेरमध्ये आंदोलकांनी गाडया पेटवून दिल्या, मालमत्तेचे नुकसान केले. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये गाडयांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले.पंजाबच्या पितयाळामध्ये आंदोलकांनी ट्रेन रोखल्या.

नंदुरबारमध्ये आंदोलकांनी शहादा-पाडळदा बसवर दगडफेक केली. जिल्ह्यात बंदला प्रतिसाद नसल्यानं संघटनांकडून बसची तोडफोड झाल्याची माहिती आहे. तर तिकडे बिहारमध्ये रेले रोको करण्यात आला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
रावसाहेब दानवेंचे जावई मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीला
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का