fbpx

कर्नाटकात ‘हे’ आमदार देणार भाजपला पाठिंबा?

bjp wins karnataka

बंगळुरू : कर्नाटक मध्ये सत्तासंघर्ष आता टोकाला पोहचला आहे.कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर आज सकाळी ९ वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.

सुप्रीम कोर्टात मध्यरात्री दोन ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

दरम्यान आता भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांकडून १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. भाजप बहुमत सिद्ध करण्यासाठी विरोधी पक्षातील लिंगायत समाजाच्या आमदारांचा पाठींबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र तो बहुमतापासून 8 जागा दूर आहे. त्यामुळे 78 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसनं थेट 37 जागा जिंकलेल्या जेडीएसला पाठिंबा दिला. काँग्रेस आणि जेडीएसनं एकत्र येत भाजपाला रोखण्याचा प्रयत्न केला. जेडीएसच्या कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री करुन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता.

मात्र वोकलिंगा समाजाच्या कुमारस्वामींना मुख्यमंत्रीपद देण्याचा मानस दोन्ही पक्षांमधील लिंगायत समाजाच्या आमदारांना पटलेला नाही. काँग्रेसमध्ये लिंगायत समाजाचे 21 आमदार आहेत. तर जेडीएसमध्ये असलेल्या लिंगायत समाजाच्या आमदारांची संख्या 10 इतकी आहे. याच आमदारांना गळाला लावण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.