Share

New Bike Update | Ducati च्या ‘या’ बाईक ची किंमत बघून व्हाल थक्क

टीम महाराष्ट्र देशा: भारत हा जगातील सर्वाधिक वेगाने विकसीत होणारा देश आहे. लोकसंख्येचा विचार करता देशात विविध गोष्टींचा बाजार जागतिक पातळीवरील कंपन्यांना आकर्षित करतो. भारतात आकर्षक दुचारी बाईक चे वेड असलेली लाखो लोक आहेत. परिणामी विविध कंपन्या आपल्या खास गाड्या भारतीय बाजारात दाखल करत आहेत. अशातच इटलीच्या प्रसिद्ध दुचाकी वाहन उत्पादक कंपनी डूकाटी (Ducati)  ने भारतीय बाजारात खास मोटारसायकल आणली आहे.

एडवांस्ड मोटार बाईक डूकाटी मल्टिस्ट्राडा व्ही 4 (Ducati Multistrada v4) ही गाडी भारतीय बाजारात उपलब्ध असणार आहे. ही गाडी कंपनीची सर्वाधिक फिचर्स असणारी आणि अधिक स्पोर्टी बाईक आहे. या गाडीमध्ये 1158 cc पाॅवरचे इंजिन आहे. या बाईक मध्ये 6.5 इंचचा इंस्ट्रुमेंट कंसोल दिला गेला आहे जो स्मार्ट फोनशी जोडला जातो.

लुक

डूकाटी मल्टिस्ट्राडा व्ही 4 या गाडीमध्ये 22-L फ्यूल टँक,इंटिग्रेटेड DRL, ड्युअल एलईडी हेडलाइट्स, उंच विंडस्क्रीन, रुंद हँडलबार, स्प्लिट-टाइप सीट्स, अपटर्न एक्झॉस्ट आणि स्लिम एलईडी टेललॅम्प्स आहेत. त्याचबरोबर यामध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी सह 6.5इंच फुल कलर टीएफटी इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे.

या नवीन बाईक मध्ये 1158 लिक्विड कूल्ड, ट्वीन-सिलेंडर, 6स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले V4 ग्रँटुरिस्मो इंजिन आहे. हे इंजिन 10,500rpm वर 170hp मॅक्झिमम पॉवर जनरेट करून 8,750rpm वर 125Nm टार्क जनरेट करतो.

किंमत

या गाडीच्या किंमतीमध्ये तुम्ही भारतीय बाजारातील 2 कार खरेदी करू शकतात. भारतात Ducati ने आपल्या या नवीन मॉडेलची किंमत 31.48 लाख रुपये (एक्स-शोरुम) ठेवली आहे. या बाईकचे बुकिंग सुरू झालेले असून कंपने पुढच्या महिन्यापासून त्याचे डिलिव्हरी सुरू करू शकते.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: भारत हा जगातील सर्वाधिक वेगाने विकसीत होणारा देश आहे. लोकसंख्येचा विचार करता देशात विविध गोष्टींचा बाजार जागतिक …

पुढे वाचा

Cars And Bike

Join WhatsApp

Join Now